गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (11:04 IST)

दुर्देवी : दिवाळीपूर्वीच घरात अंधार झाला, घरावर लाइटिंग करताना शॉक लागून पतीचा मृत्यू

दिवाळीचा सण हा प्रकाशोत्सवाचा आहे. दिवाळीच्या दिव्यांनीं काळोख दूर होतो. आणि सर्वत्र प्रकाशमान होतो. पण दिवाळीचा हा प्रकाश करणारा सण साताऱ्यातील  एका घरात नेहमीसाठी काळोख करून गेला. दिवाळी सणाच्या निमित्ताने घरावर लाइटिंग करताना वीज वितरणाच्या मुख्य लाईनला हात लागून साताऱ्यातील मोरे कॉलोनीत शनिवारी एकाचा मृत्यू झाला तर त्याला वाचविण्यासाठी आलेले त्याचे दोघे मुलं आणि पत्नी गंभीररित्या भाजून जखमी झाले. सुनील तुकाराम पवार (42) हे मयत झाले असून मनीषा पवार , ओम, आणि श्रवण हे गंभीररीत्या भाजून जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयातउपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. सातारा पोलिसांनी हे प्रकरण नोंदले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार कुटुंब शनिवारी सायंकाळी दिवाळीसाठी  घरातील दुसऱ्या मजल्यावर लाइटिंग लावण्यास गेले होते. सुनील हे लाइटिंगची माळ लावत असताना त्यांचा हात चुकून घरावरून जाणाऱ्या हायव्होल्टेज मुख्य लाईन च्या तारेला लागला त्यांना शॉक लागून ते तारेला चिटकले. त्यांना तारेला चिटकलेलं बघून पत्नी मनीषा आणि मुलं ओम आणि श्रवण यांनी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते देखील चिटकले. हा प्रकार बघून शेजारचे धावत आले आणि त्यांनी काठ्यांच्या साहाय्याने त्यांना वेगळे केले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले त्यापूर्वीच सुनील हे शॉक लागून मरण पावले होते. त्यांची पत्नी आणि मुलं गंभीररित्या भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. पवार कुटुंबाकडे घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.