मुंबई शिर्डी दरम्यान शिवशाही धावणार
मुंबईतून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांना आता शिवशाहीतून प्रवास करता येईल. कारण एसटी महामंडळाने निमआराम गाड्यांच्या जागी शिवशाही चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या परळ ते शिर्डी या मार्गावर तीन शिवशाही धावत असून आठवड्यात आणखी दोन गाड्या या मार्गावर धावतील. परळहून शिर्डीसाठी या आधी दोन शिवशाही आणि तीन निमआराम एसटी होत्या. शिवशाहीला मिळणारा प्रतिसाद पाहून एसटी महामंडळाने निमआरामचे रूपांतर शिवशाहीत करण्याचा निर्णय घेतला. शिर्डीहून परळला दर दिवशी सकाळी ७, दुपारी १.३०, सायंकाळी ४ व ५ आणि रात्री ८ वाजता शिवशाही बसेस सुटतील, तर शिर्डीहून अंधेरीला जाण्यासाठी दुपारी ३.३० वाजता शिवशाही बस सोडण्यात येईल.