गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (09:26 IST)

Earthquake: हिंगोलीमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टरस्केल वर तीव्रता 3.5

earthquake
महाराष्ट्रातील हिंगोली येथे सोमवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार आज पहाटे 5.09 वाजता भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी वर्तवण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा, कळमनुरी या तीन तालुक्यातील अनेक गावांत आज सकाळी 5.09 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या वेळी लोक खडबडून जागे झाले. आणि घराबाहेर पडले. 

भूकंपाचे केंद्र वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे असल्याचे सांगितले जात आहे. नोव्हेंबर महिन्यात हा दुसरा धक्का आहे. या पूर्वी 15 जुलै रोजी देखील भूकंपाचे धक्के दोनदा जाणवले होते. नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. सुदैवाने या मध्ये कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. 
 
 





Edited by - Priya Dixit