गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 जानेवारी 2023 (12:30 IST)

मुंबईचे मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल यांना ईडीची नोटीस

मुंबई अंमलबजावणी संचालयाने मुंबई महानगर आयुक्त इकबाल सिंग यांना कोरोनाकाळातील कंत्राटाबाबत समन्स बजावला आहे. कोरोनाकाळातील बेकायदेशीर कराराचा तपशील ईडीने मागवला असून कंत्राटी कंपनीला जम्बो कोविड सेंटर्समध्ये सेवा देण्यासाठी करार केल्यामुळे मुंबई महानगर पालिकेला तब्बल 38 कोटींचे नुकसान झाले आहे. कोरोना केंद्रावर सेवा पुरवणाऱ्या कंत्राटी कंपन्यांनी गैरव्यवहार करून महापालिकेकडून तब्बल 38 कोटी रुपये मिळवण्याचा आरोप करत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखे वर्गाकडे ऑक्टोबर 2022 मध्ये केले. या प्रकरणाचा मार्च 2022 मध्ये किरीट सोमय्या यांनी न्यायालयात अर्ज केला असून 100 कोटी रुपयांचा गैर व्यवहार असल्याचा दावा केला.
 
Edited By- Priya Dixit