1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (16:04 IST)

अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु आहे. पुण्यातील राहत्या घरी गुरुवारी सकाळपासून ईडीची झाडाझडती सुरु आहे. दौंड शुगर साखर कारखाना यांच्याशी संबंधित झाडाझडती सुरु आहे. जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. दौंड सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासा कारखान्याकडून करण्यात आला होता. मात्र, या स्पष्टीकरणानंतर देखील ईडीने जगदीश कदम यांच्या घरावर धाड टाकली.
 
दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२१ रोजी आयकर विभागाने दौंड साखर कारखान्यावर धाड मारली होती. किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. आयकर विभागाच्या धाडीनंतरही दौंड कारखान्याचे संचालक कदम यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.
 
जगदीश कदम हे अजित पवार यांचे मामेभाऊ आहेत. कदम हे सहकार नगरमध्ये राहतात. त्यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड मारली. दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, त्यांच्या तीन बहिणी आणि निकटवर्तींयावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने छापे मारल्याची घटना ताजी असतानाच मामेभावाच्या घरावार ईडीची धाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.