बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (13:27 IST)

राज्यात शाळांना 14 दिवसांच्या दिवाळीच्या सुट्ट्या

कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने नुकत्याच आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहे. शाळा सुरू झाल्यावर सहामाही परीक्षा संपत आली असतानाच आता शासनाने दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहे. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यत आता दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहे. याबाबत शासनाकडून परिपत्रक सुद्धा काढण्यात आले आहे. यामुळे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळाला आहे.
 
राज्यातील शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असणार आहे. मुंबईतील शाळांना दिवाळीची 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण निरीक्षकांनी शाळांना 1 ते 20 नोव्हेंबर सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. 
 
मुंबईतील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग मात्र अजूनही ऑनलाईनच घेतले जात आहेत. मात्र, दिवाळी काही दिवसांवर आल्याने अजूनही दिवाळी सुट्टी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, आज शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून 14 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. 
 
अशा असणार सुट्ट्या -
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा दिनांक 4 ऑक्टोबर 2021 पासून ऑफलाईन स्वरूपात सुरू झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांना विविध धार्मिक सण/उत्सवांकरीता सुट्टया घोषित करण्यात येत असतात. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक 28 ऑक्टोबर 2021 ते दिनांक 10 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहणार आहे.