मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: भुसावळ , शनिवार, 11 डिसेंबर 2021 (15:12 IST)

भाजप आमदाराच्या बॅनरवर एकनाथ खडसेंचा फोटो; दुसऱ्या वर्षीही भाजप नेते गायब

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार संजय सावकारे यांच्या ढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्स वरून सलग दुसऱ्या वर्षी भाजपचे नेते गायब झाल्याचे दिसून येत आहे. बॅनरवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा फोटो आहे. भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे कार्यकर्त्यांनी बनवलेले शुभेच्छांचे बॅनर, फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. संजय सावकारे यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर केवळ भाजप खासदार रक्षा खडसे यांचा फोटो आहे. जळगावातील राजकीय वर्तुळात मात्र बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
 
भाजपचे आमदार संजय सावकारे खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, खडसे राष्ट्रवादीमध्ये गेल्याने सावकारे काहीसे एकाकी पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्त्यांकडून देण्यात येणाऱ्या शुभेच्छांच्या बॅनरवर आता भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब झाल्याने खडसेंच्या पाठोपाठ सावकारे ही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
 
संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या बॅनरवर मागील वर्षीही भाजपच्या बड्या नेत्यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. भाजपचे जळगावातील बडे नेते संकटमोचक गिरीश महाजन यांचा देखील फोटो बॅनरवर लावण्यात आला नव्हता. त्यावेळी देखील संजय सावकारे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, संजय सावकारे यांनी त्यावेळी देखील पक्षांतराच्या चर्चा नाकरल्या होत्या.