‘नक्षलवाद्यांनी मला धमकावले...पण मी त्यांच्यासमोर झुकलो नाही’ म्हणाले एकनाथ शिंदे
गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली. यावर, एकनाथ शिंदे यांनी धमक्यांबाबत समर्पक उत्तर दिले आहे. तसेच , धमक्या देणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली. धमकीचे प्रकरण उघडकीस येताच एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. आता धमक्या दिल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या ईमेल प्रकरणी मुंबई पोलिसांनी बुलढाणा येथून दोघांना अटक केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नागपूर भेटीदरम्यान त्यांना या धमक्यांबद्दल विचारण्यात आले, ज्याला त्यांनी निर्भयपणे उत्तर दिले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, मला यापूर्वीही अशाच प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहे. मी डान्स बार बंद केले तरीही मला धमक्या येत होत्या. मला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहे पण मी घाबरत नाही. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मला यापूर्वीही धमक्या मिळाल्या आहे. पण मी घाबरलो नाही. नक्षलवाद्यांनी मला धमकावले होते, पण मी त्यांच्या धमक्यांपुढे झुकलो नाही. मी गडचिरोलीतील पहिला औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यासाठी काम केले.
मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमत्री शिंदे यांना धमकी देणाऱ्या दोन जणांना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून अटक करण्यात आली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या गाडीवर बॉम्ब टाकण्याची धमकी देणारा ईमेल गोरेगाव पोलिस ठाण्यात आला. यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Edited By- Dhanashri Naik