मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 जून 2022 (08:37 IST)

एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

eknath uddhav
नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे. जवळपास पंधरा मिनिटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. मी कोणताही वेगळा पक्ष काढलेला नाही, पक्षांतर ही केलं नाही, मला कोणत्या मुख्यमंत्री पदाची अपेक्षा नाही. तरीही माझ्यावर विधिमंडळातील गटनेते पदावरून का हटवण्यात आलं? असा रोख सवाल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्यानंतर काही प्रश्न देखील शिंदे यांनी उपस्थित केलेत. तसेच शिंदे यांनी वरिष्ठ नेत्यांच्या तक्रारी केल्याचे समजते. मला कोणत्याही मुख्यमंत्री पदाची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा आहे की, हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना आणि भाजपची पुन्हा युती व्हावी, ही इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे. पण माझ्याबद्दल ज्या बातम्या बाहेर दिल्यात जात आहेत त्या चुकीचे आहेत. अपहरणाचे आरोप माझ्यावर करण्यात येत आहेत. आता पुढे काय करायचं? ते मी अधिकृतपणे सांगतो. असेही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे.