शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (21:50 IST)

एकनाथ शिंदें म्हणाले, सत्तेसाठी प्रतारण केली नाही…

eknath shinde
पक्षाविरोधी पावले उचलली म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना शिक्षा म्हणून गटनेते पदावरुन हटवलं. तर अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली. बंडाळीनंतर एकनाथ शिंदेंवर ही पहिली कारवाई करण्यात आली आहे. कारवाई होताच शिंदे यांनी सूचक ट्विट करत मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. सत्तेसाठी कधीही प्रतारण केली नाही आणि करणार नाही असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.
 
एकनाथ शिंदे काय म्हणाले ट्विटमध्ये


आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारण केली नाही आणि करणार नाही असे ट्विट केले आहे.