बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (11:09 IST)

शिंदेंनी 30 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ, लगेचचं बदलला ट्विटरवरील फोटो

eaknath shinde
राज्याच्या राजकारणात मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. एकनाथ शिंदेंनी 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच लगेचचं ट्विटरवरील फोटो बदलला आहे. आता ते शपथ विधीनंतर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तीर्थावर जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.