बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (15:35 IST)

एकनाथराव खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खडसे यांच्यावर क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे मुंबई सेशन कोर्टात अनुपस्थित आहेत. खडसे हे आजारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी कोर्टात माहिती दिली. खडसे यांच्यावर क्रिटीकल ऑपरेशन होत आहे, त्यासाठी ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत, अशी माहिती एकनाथ खडसेंच्या वकिलांनी दिली.
 
दरम्यान, मागील काही दिवसापासून एकनाथराव खडसे आणि भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांच्या शाब्दिक युद्ध रंगले आहे. दुसरीकडे दोघांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा बँक निवडणूक सर्वपक्षीय बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात दोन बैठकही झाल्या आहेत. त्यावेळी दोन्ही नेते उपस्थित होते. मात्र त्या नंतर आता दोघांमधे अधिकच वाद वाढला आहे.