शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (09:39 IST)

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचे बोलले जात आहे. ही निवडणूक लांबणीवर पडली तर नाशिक जिल्ह्याचे दिंडोरीचे आमदार व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी अधिक काळ मिळणार आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरु होत आहे. पण, कोरोनामुळे अनेक मंत्री व आमदार अधिवेशनाला उपस्थितीत राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
मंत्रीमंडळातील गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे नुकतेच कोरोनामुक्त झाले असले तरी ते घरातूनच काम करत आहेत. तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे, राज्यमंत्री बच्चू कडू हे कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे उपस्थितीती बाबतही प्रश्न आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. विधासभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक होणार आहे.