बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जुलै 2019 (09:25 IST)

प्रदीप शर्मा निवडणूकीच्या रिंगणात ?

चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी नोकरीचा अलिकडेच राजीनामा दिला आहे. हा राजीनामा पोलीस महासंचालक कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत असून तो मंजूर झाल्यानंतर ते विधानसभा निवडणुकीसाठी अंधेरी किंवा नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
 
१९८३ मध्ये पोलीस दलात सामील झालेले शर्मा हे सध्या ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातील खंडणी विरोधी पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी ४ जुलै २०१९ रोजीच पोलीस सेवेचा राजीनामा दिल्याचे सांगितले. मात्र हा राजीनामा वैयक्तिक कारणास्तव असून निवडणुकीबाबत अजून नक्की ठरले नसल्याचा दावा त्यांनी केला. शर्मा यांचा बहुतांश कार्यकाळ हा मुंबईतील गुन्हे शाखा तसेच विशेष शाखेत गेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. सहा महिन्यांनंतर ते निवृत्त होणार होते. त्यापूर्वीच त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजीनामा दिला आहे.