1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (16:17 IST)

राजकीय नेते असताना देखील गडकरी यांनी आपले वेगळेपण जपले : फडणवीस

Even as a political leader
राज्यात कोरोनामुळे  बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आणि इतर आरोग्य सुविधांच्या तुडवड्यामुळे देखील बऱ्याच रुग्णांचे मृत्यू झाले. मात्र, अशावेळी कोणतीही तक्रार न करता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी अनेक ठिकाणी व्यवस्था उभ्या केल्या. त्यांचे हे मोलाचे कार्य आहे. राजकीय नेते असताना देखील त्यांनी आपले वेगळेपण जपले’, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.
 
‘कोरोनाच्या काळात परिस्थिती हाताबाहेर गेली असताना स्वत: गडकरी यांनी त्यात लक्ष घातले. यामध्ये नागपूर असेल किंवा विदर्भ असो. त्यांनी या शहरातील आरोग्यच्या बाबतीत लक्ष घातले. दरम्यान, याठिकाणच्या ऑक्सिजनची व्यवस्था, पीएसे प्लांट तसेच व्हेंटिलेटर याची कमतरता असेल अशा ठिकाणी त्या कशा पूर्ण करता येतील याकडे त्यांनी लक्ष दिले. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिथे राज्य कमी पडतंय आणि व्यवस्था होत नाही आहेत. तिथे त्यांनी कोणतीही तक्रार न करता आम्ही व्यवस्था उभ्या करु, असा मनात विचार ठेऊन त्यांनी बऱ्याच व्यवस्था उभ्या केल्यात. विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी ज्या गोष्टी करता येतील त्या सर्व गोष्टी आम्ही केल्या आणि आजही करत आहोत. त्यामुळे सकारात्मक नेतृत्व आणि रचनात्मक नेतृत्व राजकीय नेतृत्वापेक्षा वेगळे आहे आणि याचाच जनतेमध्ये सन्मान आहे. त्यामुळे  आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतोय’, असे देखील फडणवीस पुढे म्हणाले.