शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (16:14 IST)

दुसरी मुलगी का झाली नाही, असे म्हणत चिमुकल्याची हत्या

नागपूर जिल्ह्यातील खाप्याजवळील वाकोडीमध्ये बापाने एक वर्षाच्या चिमुकल्याची दगडावर डोके आपटून हत्या केली आहे. पहिल्या मुलानंतर मुलगी हवी होती. मात्र, दुसराही मुलगा झाला. यावरुन दारुड्या बाप नेहमी पत्नीशी भांडण करत असे. त्याने मला दुसरी मुलगी का झाली नाही, असे म्हणत चिमुकल्याची हत्या केली. 
 
भजन कवेरती याला पहिल्या मुलानंतर दुसरी मुलगी हवी होती. पण मुलगा झाल्याचा राग दारुड्या बापाला होता. याच रागातून दारुड्या बापाने दगडावर डोके आपटून मुकल्याची हत्या केली आहे.  सत्यम कवेरती असे दुर्दैवी  चिमुरड्याचे नाव आहे.  
 
मथुरा यांचा 2016मध्ये भजन कवेरती यांच्याशी विवाह झाला. 2017मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. त्यानंतर 2020मध्येही त्यांनी दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव सत्यम ठेवण्यात आले. मात्र बाप भजन याला पहिल्या मुलानंतर दुसरा मुलगी हवी होता. पत्नी मुथुराशी  यावरुन  त्यांचे  अनेकदा खटके उडायचे.  भजनने पत्नी मथुराला दारुसाठी पैसे मागितले. मात्र तिनं पैसे देण्यात नकार दिला. यावरून पत्नी मथुराशी त्याने  वाद घातला. भजनचा अगोदरच लहान मुलावर संताप होता. याच रागाच्या भरात त्याने चिमुरड्या सत्यमचे डोके दगडावर आपटत त्याची हत्या केली.