मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (19:22 IST)

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कामशेतजवळ भिषण अपघातात दोन ठार; दोन जखमी

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कामशेत बोगद्याजवळ किमी 72 येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.
 
अभिजीत घवले (डेप्युटी कमिशनर जीएसटी माजगाव मुंबई) तसेच त्यांच्या सोबत असलेले शंकर गोडा यतनाल यांचा मृतामध्ये समावेश आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या इनोवा कारचा समोरील टायर फुटल्याने भरधाव कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. या अपघातात वाहन चालक तसेच अभिजीत घवले यांच्या पत्नी गंभीररित्या जखमी झाले आहे. दोघीनाही उपचारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.