गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मालेगाव बॉम्बस्फोट: रमेश उपाध्यायालही जामीन

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला. हायकोर्टाने मेजर उपाध्याय यांना 1 लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यानंतर जामीन मिळणारे निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हे पाचवे आरोपी आहेत.
 
मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. दुचाकीत बॉम्ब ठेवून हा स्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटात 6 जण ठार झाले होते. तर शंभरहून अधिक जखमी झाले होते. या स्फोटात हिंदूत्वादी संघटनांचा हात असल्याचा आरोप असून दहशतवादविरोधी पथकाने याप्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह 12 जणांना अटक केली होती.