बुधवार, 25 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

तुळजापूरच्या भाविकांसाठी ठिकठिकाणी अन्नछत्र सेवा

शारदीय नवरात्र महोत्सव सुरू झाल्याने तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी पायी जाणार्‍या भाविकांची गर्दी वाढत आहे. या मार्गावर विविध ठिकाणी भाविकांसाठी मोफत अन्नछत्र, आरोग्य केंद्र व पोलिस प्रशासन सज्ज आहेत.
 
आई राज उदेऽऽ.... उदेऽऽ... च्या जयघोषात शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूरला पायी जाणार्‍या भाविकांची संख्या पावसाने उघड दिल्याने वाढली आहे. महिला, लहान मुले व तरुणांची संख्या लक्षणीय आहे. तुळजाभवानी मातेच्या दरबारातून अनेक गावच्या तरुणांनी ज्योत घेऊन गावात पोहोच केली. तेव्हा त्या गावात नवरात्रोत्सवात सुरूवात झाली.
 
ओसा- तुळजापूर मार्गावर भाविकांसाठी बेलकुंड, आशीव, शिंदाळा, शिवलोमोड आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणशवर संस्था व भक्तांच्यावतीने मोफत अन्नछत्र उभारण्यात सुरू आहेत. यामध्ये उपवासासह खाद्यपदार्थ, जेवण, फळे, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. 
 
आरोग्य विभागाने विविध ठिकाणी मोफत औषधोपचार केंद्र उभारले आहेत. भाविकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे.