सोमवार, 4 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

नवरात्रीत खरेदी करा या 9 वस्तू

श्राद्ध पक्षात खरेदीपासून दूर राहणारे लोकं नवरात्रीत खूप खरेदी करतात. पण काय खरेदी करत आहे हे ही तेवढंच महत्त्वाचं ठरतं आणि काय वस्तू खरेदी केल्याने काय मनोकामना पूर्ण होते हे ही जाणून घ्या:
 
परदेशात जाण्याची इच्छा असेल तर नवरात्रीत पताका किंवा ध्वज खरेदी करून पूजा करा आणि नवमीला देवीच्या मंदिरात अर्पित करून द्या.
 
आर्थिक कष्टांपासून मुक्तीसाठी चांदीची शुभ सामुग्री खरेदी करून देवीला अर्पित करा.
 
आरोग्यासाठी गायीचं तूप खरेदी करा.
 
स्वत:चं घर हवं असल्यास मातीचं घर बनवून देवघरात ठेवा.
 
नोकरीत उन्नतीसाठी 3 नारळ घरात आणून ठेवा आणि नवमीला मंदिरात अर्पित करा.
 
आकर्षण वाढवायचे असेल तर धूप, सुगंध, उदबत्ती, कापूस किंवा काही चमकणारी पांढरी वस्तू खरेदी करा.
 
सौभाग्य वृद्धीसाठी सर्व शृंगार सामुग्री खरेदी करून नवमीला देवी आईला अर्पित करा.
 
अपार धन संपत्तीसाठी किन्नरकडून पैसा घेऊन तिजोरीत ठेवा.
 
लाल दोरा अर्थात मोली खरेदीकरून त्यात नऊ गाठी बांधून देवीला अर्पित करा नंतर नेहमीसाठी स्वत:जवळ ठेवा. प्रत्येक कार्यात यश मिळेल.