शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

नवरात्रीत का ठेवू नये खुले केस, जाणून घ्या

केशरचना हे महिलांच्या आवडत्या शृंगारातून एक आहे. कोणत्याही विशेष समारंभात जाण्यासाठी जेव्हा महिला तयार होतात तेव्हा हेअर स्टाइलकडे विशेष लक्ष देतात. परंतू हिंदू शास्त्रांमध्ये केस खुले ठेवणे चांगले मानले जात नाही. या नवरात्रीत जाणून घ्या की केस खुले सोडण्यास मनाही का? 
 
हिंदू मान्यतेनुसार कोणतेही शुभ काम करताना महिलांनी आपले केस व्यवस्थित विंचरुन बांधावे. कारण खुले केस शोक असल्याचे चिन्ह आहे.
 
पौराणिक ग्रंथांप्रमाणे केस बांधून ठेवण्यामागे एक तर्क हे देखील आहे की अशाने महिला नात्यांना बांधून ठेवण्यात सक्षम असते.
 
दररोज आणि विशेषकर नवरात्रीत खुले केस सोडून झोपल्याने नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो असे देखील मानले जाते.
 
असेही देखील म्हटले गेले आहे की खुले केस ठेवल्याने घरात वाद आणि क्लेश उत्पन्न होतात.