बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शेतीत बचत असती तर गाव सोडण्याची वेळ आली नसती: धोंडगे

मूठभर टाकून पोतंभर देणारी म्हणजे भांडवलाचा गुणाकार करणारी शेती. पण आज मात्र राबराब राबूनही कुटुंबाच्या गरजा भागत नाहीत. टाकलेले भांडवल सुद्धा निघत नसल्याने, फक्त कर्जच माथी येत असल्याने, बचत नसलेल्या धंद्यातून जीव वाचवून गाव सोडण्याची वेळ आपल्या सर्वांवर आली असल्याचे मत शंकरअण्णा धोंडगे यांनी शेतकरी-शेतमजूर सुरक्षा अभियानाअंतर्गत भोसरी येथे झालेल्या मेळाव्यात व्यक्त केले.
 
सरकारची वक्रदृष्टी असल्याने गावागावातील तरूण शेतकरीवर्ग दिशाहीन झाला आहे. शेतकऱ्यांच्या तरूण मुलांची लग्न होत नाहीत. शेती व्यवसायाची प्रतिष्ठा खालावली आहे. तरूण शेतकऱ्यांनी संघटीत होऊन सरकारविरोधात निषेध करण्याची गरज असल्याचे वक्तव्य धोंडगे यांनी केले.