शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शेतकर्‍यांच्या संपावर शिक्कामोर्तब, एक जूनपासून संप

येत्या एक जूनपासून होऊ घातलेल्या शेतकऱ्यांच्या संपावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पुणतांब्यातील राज्यव्यापी शेतकरी बैठकीत हा संपाचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे. 
 
यासह अनेक मागण्यांवर शेतकऱ्यांनी ठाम राहून संपाचा निर्णय घेतला आहे. एक जूनपासून शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला कोणताही शेतीमाल आणि दुध विकणार नाहीत, त्यामुळे राज्यातील सर्वसामान्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे. तसंच शहराकडे जाणारं दुध आणि भाजीपालाही शेतकऱ्यांकडून रोखला जाणार आहे.