शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:45 IST)

नगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

bijali
अहमदनगर महानगरपालिका शहर पाणीपुरवठा योजनेवरील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून होणार्‍या वीज पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.
त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रांतील पाणीपुरवठा विस्कळीत होईल. अशी माहिती महापलिकाने दिली आहे. मुळा धरणातून उपसा केलेले पाणी विळद येथून पम्पिंग करून ते MIDC येथील नागापूर शुद्धीकरण केंद्रात येण्यास विलंब लागत आहे.
विस्कळीत झालेला पाणी उपसा सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा अवधी लागू शकतो असे महापालिका प्रशासनाने कळवले आहे. अनियमीत पाणी उपशामुळे शहरातील वितरण टाक्या वेळेत भरत नाहीत. त्यामुळे पाणी वितरणास अनेक अडचणी येत आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागाचा मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरतीचौक, माळीवाडा, कोठी या भागासह सर्व उपनगरास सोमवारी उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, नालेगाव, माळीवाडा (काही भाग), चितळे रोड, कापडबाजार, माणिक चौक, नवीपेठ, तोफखाना,
आनंदी बाजार तसेच सावेडी, बालिकाश्रम रोड परिसर इत्यादी भागास पाणीपुरवठा मंगळवारी होणार नसून तो बुधवारी होईल. शिल्लक असलेले पाणी नागरिकांनी जपून वापरावे असे महापालिका प्रशासनाने नागरिकांनी आवाहन केले आहे.