शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (19:37 IST)

लालबागच्या राजाचा जुना व्हिडिओ व्हायरल, ‘बिग बी’ही फसले

fact check
कोरोना कालावधीमुळे, गणेशोत्सव साजरा करताना काही महत्त्वाचे प्रोटोकॉल सेट केले गेले आहेत. एकीकडे ‘लालबागचा राजा’च्या स्वागताची तयारी जोरात सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे मुंबईतील इतर गणपती देखील चर्चेत आहेत.
 
दरम्यान, बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ‘लालबागच्या राजा’ची पहिली झलक दाखवणारा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करताना अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ओम गण गणपतये नमः.. गणपती बाप्पा मोरया..पहला दर्शन, लालबागचा राजा.’. मात्र, इथेच ‘बिग बी’ देखील फसले आहेत. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ यंदाचा नसून, खूप जुना आहे. 

दोन दिवसांपासून हाच व्हिडीओ लालबागच्या राजाची यंदाची अर्थात 2021 या वर्षातील मूर्तीची पहिली झलक म्हणून हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. याच व्हायरल व्हिडीओला शेअर करण्याचा मोह अमिताभ बच्चन यांना देखील आवरला नसावा त्यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडीओ यंदाचा नसून, वर्ष 2016 म्हणजेच 5 वर्ष जुना आहे.