शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (20:49 IST)

याकूबच्या चुलत भावासोबत फडणवीस यांचा फोटो!-किशोरी पेंडणेकरयांचा भाजपच्या आरोपांवर पलटवार

रऊफ मेमनसोबत शिवसेना नेत्या किशोरी पेंडणेकर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून आता भाजपकडून किशोरी पेडणेकरांना कात्रीत पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र पेडणेकरांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपांवर पलटवार केला आहे. 
 
किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. तसेच आरोप करणाऱ्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन सुचवा असा खोचक टोलाही लगावला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा एक फोटो ट्विट केला आहे. पेडणेकर यांनी ट्वीट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील दिसत आहेत.
तर दुसरीकडे भाजपने केले आरोप फेटाळत महापौर असताना धार्मिक स्थळांच्या तक्रारी ऐकण्यासाठी मी गेले होते. बैठकीला कोण कोण उपस्थित होते, याची मला कल्पना नाही. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्त्रींवर आरोप करुन भाजपला काय मिळतं. आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र आखलं जात आहे, आमचा गुन्हेगारांशी संबंध असण्याचा प्रश्नच नाही. मात्र वारंवार कुठल्या ना कुठल्या प्रकरणावरुन आमच्यावर आरोप करुन आमचं संयमी नेतृत्व कसं भडकेल, याची वाट भाजप पाहत आहे असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.