शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (19:19 IST)

Eknath Shinde : शिवसेनेचे माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार

eknath shinde
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात सध्या भूकंप आला आहे या संघाचे  शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण एकनाथ शिंदे गटात लवकरच जाण्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीही वेळ दिला नाही असेही ते म्हणाले. 
 
सदानंद चव्हाण हे एकनाथ शिंदे यांचा गटात प्रवेश करणार असल्याच्या बातमीनेच राजकीय वातावरणात खळबळचे वातावरण आहे. येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावर येणार आहे त्यावेळी मी शिंदे गटात प्रवेश करण्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.उद्धव ठाकरे यांनी कधीच आपल्याला वेळ दिला नाही अशी ही त्यांनी नाराजगी बोलून दाखवली.