शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मे 2019 (09:51 IST)

बाप्परे, पतीची केली खोटी सही, मिळवला घटस्फोट

मुंबईतील मुंब्रा येथील निलोफर (31) नावाच्या महिलेने दुबईत राहणाऱ्या पतीची म्हणजेच मस्तान यांची खोटी सही करून घटस्फोट मिळवला. एवढेच नाही तर तडकाफडकी प्रियकरासोबत लग्न करुन दुसऱ्यांदा संसारही थाटला. तिचा पहिला नवरा घरी आल्यानंतर सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर नवऱ्याने बायकोविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
 
दुबईमध्ये मेकॅनिकचे काम करणाऱ्या मस्तान आणि निलोफर यांना नऊ वर्षांचा मुलगा आहे. 2007 साली मस्तान दुबईला गेला होता. मस्तानला वर्षातून एकदा सुट्टी मिळायची आणि तेव्हाच तो घरी यायचा. नवरा परदेशात असताना निलोफर तिच्या जुन्या प्रियकराच्या संपर्कात आली. त्यांच्यात पुन्हा प्रेमसंबंध जुळले. यानंतर निलोफरचा स्वभाव बदलला, तिच्यात आणि मस्तानमध्ये भांडणं व्हायला लागली. पुढे मस्तान 2017 साली जेव्हा हिंदुस्थानात आला तेव्हा निलोफर त्याला घरात यायला बंदी केली, ती त्याला भेटायलाही तयार नव्हती. त्यानंतर सदरचा प्रकार उघड झाला.