गुरूवार, 8 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified सोमवार, 13 मे 2019 (15:20 IST)

नवरा मोदींकडे गेल्यावर बायका घाबरतात, मायावतींची मोदींवर टीका

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलवर बलात्कार प्रकरणावरून मायावतींना लक्ष्य केल्यानंतर आता टीका वैयक्तिक पातळीवर पोहोचल्या आहेत. मायावतींनी मोदींवर जोरदार टीका करत म्हटले की राजकीय लाभासाठी आपल्या पत्नीला सोडणारे बहीण आणि पत्नीचा सन्मान करणे म्हणजे काय हे कसे जाणणार. बसपा सुप्रीमो म्हणाल्या की भाजप नेत्यांच्या पत्नी त्यांचे पती मोदींकडे गेल्यावर घाबरतात. 
 
मोदी आपल्याला पतीपासून वेगळे तर करणार नाही कदाचित अशी भी‍ती त्यांना वाटत असावी, अशी टीका मायावतींनी केली.
 
यावर भाजपा नेता संबित पात्राने ट्विट करत म्हटले की मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जे शब्द वापरले आहेत ते अत्यंत अशोभनीय आहेत. हा कसला विचार आहे. मोदींचा एवढा द्वेश का? मोदींनी आपल्या कुटुंबाऐवजी देशालाच परिवार मानले म्हणून ? मायावतीजी आपल्यासाठी आपला भाऊ मोठा आहे... मोदींजीसाठी देश...
 
मोदींवर टीका करताना मायावती म्हणाल्या की, मोदी राजकीय लाभ मिळवण्यासाठी जातीचे राजकारण करतात.