रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सासरी यातनांमुळे परेशान महिला निर्वस्त्र 3 किमी चालत पोहचली पोलिस स्टेशन

राजस्थानमध्ये सासरी छळ इतकं वाढला की एक महिला निर्वस्त्र पोलिस स्टेशन पोहचली. 
 
चुरू जिल्ह्यातील बीदासरच्या वार्ड 5 मध्ये राहणाऱ्या महिलेचे रविवारी सकाळी 8.30 च्या सुमारास सासरच्यांशी भांडण झाले. तिच्यासोबत मारहाण होऊ लागली. महिलेने पोलिसांना फोन करून तक्रार केली तरी पोलिस वेळेवर मदतीला पोहचली नाही तेव्हा महिलेला निर्वस्त्रच 3 किमी लांब स्टेशनपर्यंत चालून जावं लागलं. ती 45 मिनिट गर्दी असलेल्या राज्य मार्ग नंबर 20 वर अशाच हालतीत चालत गेली.
 
महिला रस्त्यातून जात असताना एका न्हाव्याने तिचा व्हिडिओ तयार केला. लोकांप्रमाणे पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेतले नाही. नंतर महिलेची तक्रार नोंदवत तिच्या सासू, आणि इतर कुटुंबातील सदस्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी व्हिडिओ काढणार्‍या न्हाव्याला देखील अटक केली.
 
महिलेचा आरोप आहे की सासरच्यांनी मारहाण करत तिचे कपडे देखील फाडले. तिने पोलिस वेळेवर न पोहल्याची तक्रार केली. ती निर्वस्त्र निघाली तेव्हा रस्त्यात कुटुंबातील व इतर लोकांनी तिला कपडे घालण्याचा व ऑटोत बसवण्याचा प्रयत्न देखील केला पण तिने ऐकले नाही. शेवटी पोलिस स्टेशनाहून 100 मीटर लांब असताना पोलिस अधिकारी आणि कॉन्स्टेबलने चादर तिच्या अंगावर घातली.
 
महिला अकोला येथील रहिवासी आहे. एक वर्षापूर्वी तिचं बीदासरमध्ये विवाह झाले होते. नवरा सहा महिन्यापासून आसामामध्ये मजुरी करण्यासाठी गेलेला आहे. महिलेचा आरोप आहे की सासरची मंडळी तिला परेशान करतात आणि नवर्‍याने पाठवलेले पैसे देखील हिसकावून घेतात.