बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सिक्कीममध्ये हिमवृष्टीमुळे तब्बल 300 याकचा मृत्यू

उत्तर सिक्कीममध्ये सतत जोरदार हिमवृष्टीमुळे तब्बल 300 याकचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर सिक्कीमचे जिल्हा दंडाधिकारी श्रीराज यादव यांनी ही माहिती दिली.
 
मुकुटंग व युमथांग भागात डिसेंबर 2018 पासून मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली असून आतापर्यंत मुकुटंग भागात याकचे 250 मृतदेह सापडले आहेत. तर 50 मृतदेह हे युमथांगमध्ये सापडले आहे. माहितीनुसार, 300 याकचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. हिमवृष्टीमुळे प्राण्यांना काहीच खायला मिळत नसल्याने उपासमारीमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा.
 
इंडो तिबेट सीमा पोलीस व जिल्हा प्रशासन याबाबत अहवाल तयार करत आहेत. पशूसंवर्धन विभागाने वैद्यकीय पथक मुकुटंग येथे पाठवले असून जे याक जिवंत आहेत त्यांच्यासाठी अन्न आणि चारा पाठवण्यात आला आहे. याकची वैद्यकीय तपासणी देखील केली जाणार आहे. मुकुटंगमधील 15 व युमथांगमधील 10 कुटुंबांच्या मालकीचे हे याक आहेत. या घटनेत फटका बसलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.