रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (20:39 IST)

रेल्वे अडवून केला शेतक-यांनी सरकारचा धिक्कार

Protest
लातूर : शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर हे रस्त्यावर टोकाची संघर्ष लढाई लढत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गावगाड्यातील प्रश्न घेऊन पक्षाचे झेंडे बाजूला ठेवत शेतकरी शेतमजूर आणि निराधार म्हणून एकत्र येत आरपारचा संघर्ष लढा उभा राहिला आहे.
 
त्यामुळे राज्यभर सरकारची कोंडी झालेली आहे म्हणून रविकांत तुपकर आणि कार्यकर्त्यांना धरपकड करत जणू ते आतंकवादी आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण सरकार करीत आहे. तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केल्याने शुक्रवारी लातूर हरंगुळ रेल्वे स्टेशनवर राजेंद्र मोरे राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी रेल रोको करुन सरकारचा धिक्कार केला आहे.