मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली
सध्या राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोक जरांगे पाटील हे आंदोलन करत आहे. येत्या 20 जानेवारीपासून ते मुंबईला येणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणी साठी आत्ता पर्यंत अनेकांनी आत्महत्या केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना कोणतेही टोकाचे पाऊल न घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी देखील आत्महत्या करू नये असे देखील म्हटले आहे.
गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन दोन तरुणांनी टोकाची भूमिका घेत आत्महत्या केली आहे. प्रदीप मते आणि सचिन शिंदे असे या मयत तरुणांची नावे आहेत. हे दोघे परभणी आणि लातूर जिल्याचे होते. परभणीतील सनपुरी गावातील सचिन शिंदे (34) याने मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे असे चिट्टीत लिहून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर
लातूर जिल्ह्यात आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण घेणाऱ्या प्रदीप मते (21) ने मराठा आरक्षण असे लिहून चिट्ठी मोबाईल स्टेटसला लावून खाजगी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून मृतदेह ताब्यात घेतले आहे.
Edited by - Priya Dixit