बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (12:33 IST)

अपघातात बाप-लेक जागीच ठार

death
जळगाव- अंधारात रस्त्यावर बैलगाडी न दिसल्यामुळे दुचाकी थेट बैलगाडीवर धडकून झालेल्या अपघातात बाप व लेक जागीच ठार झाले तर पत्नी व मुलगा जखमी झाले आहे. ही घटना धरणगाव तालुक्यातील रोटवद गावाजवळ सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
 
प्रभाकर रघुनाथ सूर्यवंशी ( वय ३५ वर्ष, रा. पिंपळगाव ता. शिंदखेडा, जि. धुळे) तसेच त्यांची मुलगी नायरा प्रभाकर सूर्यवंशी (वय वर्ष ७) हे बाप-लेक जागीच ठार झाले. तर पत्नी ममता रघुनाथ सूर्यवंशी व मुलगा मोहित प्रभाकर सूर्यवंशी हे जखमी झाले आहेत.
 
नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रभाकर रघुनाथ सूर्यवंशी हे पत्नी व मुलांसह दुचाकीने गेले होते आणि परत येताना धरणगाव तालुक्यातील रोटवद गावाजवळ रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अंधारात बैलगाडी दिसली नाही. त्यावर सुर्यवंशी यांची दुचाकी जावून धडकली. या अपघातात दुचाकीवरील प्रभाकर सुर्यवंशी व त्यांची मुलगी नायरा हिचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी ममता व मुलगा मोहित हे जखमी झाले. ही धडक एवढी जोरदार होती की संपूर्ण दुचाकी चक्काचूर झाली.
 
जखमींना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले गेले आहे.