संबंधित माहिती
- कोरडवाहू जमिनीत करून दाखवली सफरचंदाची यशस्वी शेती
- नगराध्यक्षांकडून अभियंत्याला मारहाण ! सीसीटीव्हीमध्ये चित्रित…
- स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर ; राजू शेट्टींची मोठी घोषणा
- कोविड काळात झेडपी साहित्य खरेदीत घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयाकडून दखल, मग पालकमंत्री गप्प का?
- नाशिकमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग इतक्या टक्क्यांनी वाढला; मालेगावकडे सगळ्यांचे लक्ष
चहात फिनेल तर गुलाबजाममध्ये विष
सांगलीत पतीला जेवणाच्या डब्यातील खाद्य पदार्थात विषारी औषध घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील गौरी प्रसन्ना खंकाळे हिच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीने जेवणात तब्बल तीन वेळा विष घालून नवऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी पतीचे प्राण बचावले. एकदा जेवणाच्या डब्यात, तर दुसऱ्यांदा चहामध्ये फिनेल घातले. तिसऱ्या वेळी गुलाबजाममध्ये उंदीर मारण्याचे औषध घातले होते. मात्र पत्नीने वारंवार गुलाबजाम खाण्याबाबत केलेल्या आग्रहामुळे पतीच्या मनात शंका निर्माण झाली. त्याने खडसावून विचारताच पत्नीने कृत्याची कबुली देत माझी चूक झाली, माफ करा, मी पुन्हा असे करणार नाही, असे सांगितले. त्यावरुन हा प्रकार उघडकीस आला.
यानुसार तिच्यावर कलम 307 आणि 328 नुसार इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर पतीने पोलिसात धाव घेतली. इस्लामपूर पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.दिली. त्यानंतर पतीने पोलिसात धाव घेतली. इस्लामपूर पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.
