'त्या' दोन परिचारीकांविरोधात गुन्हा दाखल
भंडार्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये लागलेल्या आगी प्रकरणी रुग्णालयाच्या दोन परिचारीकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारीका शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबीलढुके, अशी या दोघींची नावे असून त्यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर आज रुग्णालयातील दोन परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिचारिकांच्या निष्काळजीपणाने ही घटना घडल्याचा आरोप केला आहे.
भंडार्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिशु केअर युनिटला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले होते. या शिशु केअर युनिटमध्ये १७ बालके होती. यापैकी ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, या घटनेमध्ये दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.