1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (22:37 IST)

कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान आराखड्याला पर्यावरण मंत्रालयाने अंतिम मंजुरी

मुंबई आणि मुंबई उपनगर क्षेत्रासाठी असलेल्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान आराखड्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. यामुळे मुंबईतील सागरी प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईत सीआरझेड लागू केल्यामुळे अनेक प्रकल्पांचं बांधकाम रखडलं होतं. पण आता अनेक प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे.  
 
पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीमुळे बांधकामाची समुद्रकिनाऱ्यापासून 500 मीटरऐवजी 50 मीटरपर्यंत कमी झाली आहे. कोस्टल रोड, न्हावा शेवा  मार्गासाठी काही प्रमाणात समुद्रात बांधकाम करावा लागणार आहे. आता प्रकल्पांचाहा मार्गही मोकळा झाला आहे. याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले आहेत.
 
भूपेंद्र यादव अलिकडेच नवी मुंबईच्या दौर्‍यावर असताना एक विशेष बैठक मुंबईत आयोजित करून यासंदर्भातील विनंती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना केली होती. त्याचवेळी येत्या 15 दिवसांत ही प्रक्रियेला गती देण्यात येईल, असं आश्वासन भूपेंद्र यादव यांनी दिलं होतं. त्यानंतर या मंजुरीची प्रत  जारी करण्यात आली आहे. 
 
सीझेडएमपीचा आराखडा हा राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना तयार करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करीत तो केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली होती. यामुळे पर्यटन क्षेत्र, त्या क्षेत्रातील रोजगार आणि एकूणच पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.