गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे धक्कादायक विधान
होमगार्डचे महासंचालक आणि मुं बईचे माजी पोलीस आयुक्त हे कोणाचीही परवानगी न घेता मुंबईतून परदेशात पळून गेल्याचा सर्वांचा संशय आहे. एक महासंचालक दर्जाचा अधिकारी देशाबाहेर जायचे असेल तर वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र परमबीर सिंह यांनी गृहमंत्री म्हणून माझी किंवा राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची परवनागी घेतली नाही. असे धक्कादायक विधान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी केले आहे.
आतापर्यंत परमबीर सिंह यांना ५ समन्स
पाठवण्यात आले असून नॉन बेलेबल वॉरंटही त्यांच्या नावाने पाठवण्यात आले आहे. तसेच लूकआऊट नोटीस त्यांना पाठवण्यात आली असून त्यांच्या मुंबई आणि चंदीगढ येथील घर बंद असल्याचे सीआयडी पथकाच्या तपासात निष्पन्न झालं आहे.
गेल्या काही दिवसात परमबीर सिंह हे नॉन रिचेबल असून ते कोणाच्याही संपर्कत नाही त्यामुळे ते मुंबई महाराष्ट्र मधून परदेशात पळून गेल्याचा संशय पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी केंद्र सरकारच्या संपर्कात असून सिंह यांनी चौकशीला सामोरे जावे असे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.