बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (16:00 IST)

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून एकाला अटक

मुंबईतूनही दहशतवादाशी कनेक्टेड अशी तिसरी अटक आज गुरूवारी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून  करण्यात आली आहे. वांद्रे येथून इरफान शेख या संशयिताला अटक करण्यात आली आहे. इरफान शेख हा वांद्रे पूर्व येथील खेरवाडी येथे राहणारा आहे. ही व्यक्ती लेडीज टेलर म्हणून या भागात काम करत होती.दिल्लीत अटक करण्यात आलेल्या सहा अतिरेक्य़ांशी संबंधित प्रकरणात इरफान शेखला अटक करण्यात आली आहे. 
 
मुंबईतील दहशतवादाचे पहिले कनेक्शन म्हणजे जान मोहम्मदला १८ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. धारावीत राहणाऱ्या जान मोहम्मदला राजस्थानच्या कोटा येथून मुंबई निजामुद्दीन प्रवासादरम्यान अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठच मुंबईतून आणखी दोन जाणांना अटक करण्यात आली. मुंबईतून जोगेश्वरी आणि मुंबईतून दोघांना अटक करण्यात आली होती.