गुरूवार, 11 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (15:56 IST)

राज्यातील निवासी डॉक्टरांचा १ ऑक्टोबरपासून संपाचा इशारा

Resident doctors in the state are on strike from October 1
कोरोना काळातील शैक्षणिक फी माफी, प्रोत्साहन भत्ता, पालिका महाविद्यालय निवासी डॉक्टरांचा टीडीएसचा मुद्दा व राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलसंबंधित समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते, मात्र एक महिना उलटूनही यावर अद्याप निर्णय जाहीर न झाल्याने राज्य़भरातील निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबरपासून संपाचा इशारा दिला आहे. राज्यातील जवळपास ५ हजारांहून अधिक निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. असे पत्रक महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटने (MARD)कडून जारी करण्यात आले आहे. 
 
य़ा मागण्यांविषयी स्मरणपत्र निवासी डॉक्टरांनी संबंधित विभागाला दिले आहे. या पत्रात मार्डने राज्य सरकारला मागण्याविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली असून, निवासी डॉक्टरांच्या भावनांचा विचार करत मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत याविषयी तात्काळ निर्णय न झाल्यास १ ऑक्टोबरपासून बेमुदत राज्यस्तरीयय संपावर जाण्याची निर्णय घेतला आहे. या मागण्या लेखी स्वरुपात मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही. असे माहितीपत्र प्रत्येक कॉलेज प्रशासनाला दिल्याची माहिती सेंट्रल मार्डने दिली आहे.