1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (08:13 IST)

मोबाइलमध्ये गेम खेळू नको म्हणून त्याने केली आत्महत्या

buldhana-16 year old child
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव  येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाइलमध्ये गेम  खेळू नको म्हणून चिडलेल्या एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्याकेली आहे. त्या मुलाला आई-वडिलांनी मोबाइलमध्ये गेम खेळू नको म्हणून हटकले होते. या कारणावरुन रागावलेल्या मुलाने थेट टोकाचं पाऊल उचलंल आहे. घरातून निघून जाऊन शेजारी असलेल्या विहिरीत त्याने उडी घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
 
कोरोनाच्या काळात राज्यात शाळेला कुलूप लागलं. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षणाऐवजी मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण देण्यास अधिक प्राधान्य वाढलं. मात्र, अभ्यासाऐवजी मुलाचं लक्ष मोबाईलमध्ये गुंतलं. काही मुलं मोबाईलच्या आहारी गेल्याने अनेक धक्कादायक घटना देखील उघडकीस आल्याचं पाहायला मिळालं आहे.