शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (22:31 IST)

वाचा, कॉलेज, महाविद्यालये कधी उघडणार

राज्यातील कॉलेज, महाविद्यालये दिवाळीनंतर सु रु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सशी चर्चा करुन कॉलेज सुरु करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. सीईटीच्या परी  क्षा पुढे ढकलल्यास कॉलेज सुरु करण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले आहे. राज्यातील कमी कोरोना प्रादुर्भाव  असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉलेज नोव्हेंबरपा सून सुरु करण्याबाबत विचार असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सामंत यां नी दिली आ हे. 
 
राज्याचे उच्च  व तंत्र शिक्षण मंत्री उदय  सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राज्यातील कॉलेज सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची   माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी म्हटलं आहे की, कॉलेजचे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. १ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात महाविद्या ल  ये सुरु करणार असल्याची माहिती पसरत आहे. तर १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे युजीसीचे म्हणणे आहे. पण त्याच कालावधीत आपल्या  क डे दिवाळीचा सण आहे. त्यामुळे दिवाळीचा सण गेल्यानंतर कॉलेज सुरु करण्याची परिस्थिती आहे. किती टक्क्यांमध्ये कॉलेज सुरु करण्यात येणार  या बाबत विचार सुरु आहे. परंतु दिवाळीनंतर प्रत्यक्षात कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.