1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (18:44 IST)

अलिबागमध्ये नाट्यगृहात अग्नितांडव, अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल

Alibagh Fire
अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग लागल्याचे वृत्त मिळाले आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे खळबळ उडाली असून या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग संध्याकाळी  लागली आणि आगीने रौद्ररूप धारण केले आहे. या नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरु  होते. आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीने संपूर्ण नाट्यगृहाचे खूप नुकसान झाले आहे. धुराचे लोट दूरवर पसरले होते.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.