रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मोबाईल नव्हे आता तर पॉवर बँकेचा स्फोट, घर जळाले

आपण नेहमी मोबाईलचा स्फोट होऊन जखमी झाल्याच्या बातम्या एकल्या आणि पहिल्या आहेत. मात्र आता अजून काळजी घेण्याची गरज आहे. बीड येथे मोबाईल चार्जिंगसाठी लागणाऱ्या पॉवर बँकेचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घरातील फर्निचर पूर्ण जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

बीड शहरातील  कोतवाल गल्ली भागात ही  घडली आहे. या प्रकारे  पॉवर बँकेचा स्फोट होण्याची पहिलीच घटना आहे. बाबरस कुटुंबीय यांच्या घरी चार्जिंगला लावलेल्या पॉवर बँकचा स्फोट झाला होता. मात्र ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी बाबरस कुटुंबीय घरी नव्हते, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे. पॉवर बँक चार्जिंगला लावून ते नातेवाईकांकडे निघून गेले होते. मात्र काही वेळाने अति गरम झाल्याने  पॉवर बँकेचा स्फोट झाला असावा असा अंदाज वर्तवला गेला आहे. स्फोटामुळे बॅटरीमधील सगळे पार्ट्स जळून खाक झाले आहेत. शेजाऱ्यांनी प्रसंगावधान राखत वेळीच आग विझवली त्यामुळे पूर्ण घर जळाले नाही. यापुढे  पॉवर बँक वापरतांना काळजी घेणे गरजेचे आहे.