1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (13:17 IST)

35 एकरातील तुरीला अज्ञातांकडून आग, लाखो रुपयांचे नुकसान

Fire on 35 acres of land by unknown persons
काही अज्ञातांनी तुरीची गंजी पेटवून दिल्याचा प्रकार महागाव मधील तुळशीनगर भागात घडला आहे. संजय जानुसिंग राठोड यांनी 35 एकरातील तुरीची कापणी करुन साठवणूक केली होती. या 35 एकरात जवळपास 80 क्विंटल तुरीचे उत्पादन शेतकऱ्यास अपेक्षित होते. पण अज्ञातांनी केलेल्या प्रकारामुळे तुरीची राखच पाहवयाची वेळ ओढावली. 
 
सध्याच्या बाजारभावानुसार 3 ते 4 लाखाचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरीकडून करण्यात येत असून वातावरणातील बदलामुळे पीक जोपासण्यासाठी अधिकचा खर्चही झाला होता. शेतातील हे चित्र पाहून त्यांना धक्काच बसला. गेल्या 8 दिवसांपासून कापणीचे काम सुरु होते शिवाय पावसाने उघडीप दिल्याने दोन दिवसांमध्ये यंत्राचे सहायाने ते मळणी करणार होते. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत त्यांनी पिकांची जोपासणा केली पण अज्ञातांनी केलेल्या या घटनेमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 
संजय जानुसिंग राठोड यांनी महागाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.