मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (12:11 IST)

गर्भवती वनरक्षक महिलेला पोटात लाथ मारून डोक्यात दगड मारला

सातारा येथील पळसवडे गावच्या माजी सरपंचाने वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे‌. वनविभागाच्या महिला कर्मचारी या तीन महिन्यांच्या गर्भवती असून त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घडलेल्या प्रकाराची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून माजी सरपंचाला अटक करण्यात आली आहे.
 
सातारा तालुक्यातील पळसावडे येथे घडलेल्या प्रकारात पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. वनरक्षक महिला तीन महिन्यांच्या गर्भवती आहेत.
 
त्यांना न विचारता वन मजूर दुसरीकडे नेल्याच्या कारणावरुन चिडून वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी ही मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिसांत ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे.