रविवार, 16 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (12:47 IST)

“कोणी खूर्ची देतं का खूर्ची” फडणवीसांची अशी अवस्था झालीये: संजय राऊत

sanjay raut digs at devendra fadanvis
आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आम्हाला आनंद, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. संजय राऊत हे नटसम्राट असून दिवसा एक आणि संध्याकाळी एक बोलतात अशी टीका फडणवीस यांनी केली होती, यावरच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
नटसम्राट हे महाराष्ट्राचे फार मोठे वैभव असून गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा असल्याचं त्यांना माहिती नाही. महाराष्ट्रातील सगळे नटसम्राट गोव्यातूनच गेले असून संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. त्यामुळे नटसम्राटची खिल्ली उडवून ते गोव्यातील नाट्यकर्मींचा आणि जनतेचा अपमान करत आहेत. त्यामुळे नाटकातील एक वाक्य कोणी घर देता का घर तशीच कोणी खूर्ची देतं का खूर्ची अशी अवस्था फडणवीसांची झाली असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
 
दरम्यान गोव्यातील आजची परिस्थिती त्रिशंकू विधानसभेकडे चालली आहे. तरी राष्ट्रवादीसोबत आम्ही आमच्या काही जागा जिंकून आलो तर सरकारमध्ये आमचं स्थान असेल, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.