गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापुर , गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (08:05 IST)

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका यल्लाप्पा जाधव वय 49तसेचसोमप्पा सिद्दप्पा कोठारगस्ती वय 62 यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री व्ही जी मोहिते साहेब यांनी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
 
यात हकीकत अशी की गॅलेक्सी हॉटेल चे मालक अमोल अशोक जगताप यांनी सोलापुरातील बऱ्याच खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते त्यांना झालेल्या प्रचंड मानसिक मानसिक त्रासापोटी दिनांक 13/7/20 रोजी राहत्या घरी स्वतःच्या दोन लहान मुलांना व पत्नीला जीवे ठार मारून आत्महत्या केली होती या घटनेमागे शहरातील खाजगी सावकार जबाबदार असल्याची फिर्याद मयताचा भाऊ राहुल जगताप यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती तसेच मयताने चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती त्यावरून पोलिसांनी नगरसेवक लक्ष्मण जाधव दशरथ कसबे डनबलदिंडी सलगरकर कोठारगस्ती यांना अटक केली होती
 
अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी आरोपींचे वकील एडवोकेट मिलिंद थोबडे काय म्हणतात ते पहा
 
त्यांनी वकिलांमार्फत जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता अर्जाच्या च्या सुनावणीच्या वेळेस फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी मध्ये आरोपींची नावे नाहीत मयताने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आरोपींची नावे नाहीत मयत व आरोपी मध्ये झालेला व्यवहाराचा ठोस पुरावा सरकार पक्षातर्फे दिला गेला नाही असे मुद्दे न्यायालयात मांडले ते मुद्दे ग्राह्य धरून न्यायाधिशांनी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपींना जामीन मंजूर केला
 
यात आरोपीतर्फे एडवोकेट मिलिंद थोबडे एडवोकेट राज पाटील एडवोकेट इस्माईल शेख अडवोकेट नीलेश जोशी एडवोकेट एम एम कुलकर्णी एडवोकेट विनोद सूर्यवंशी तर सरकार तर्फे अडवोकेट प्रदीपसिंह राजपू यांनी काम पाहिले.