सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 मे 2023 (18:01 IST)

सोलापूर : प्री-वेडिंग शूटवर मराठा समाजाची बंदी

Sambhaji Brigade
आपलं लग्न जरा हटके झाले पाहिजे सध्या सर्वांना असे वाटते. सध्या लग्नाआधी प्री-वेडिंग शूट करण्याची नवी पद्धत आहे. याला चांगली मागणी देखील आहे. सोलापुरात आयोजित मराठा वधू वर मेळाव्यात मराठा समाजातील मुलामुलींच्या प्री वेडिंग शूट वर बंदी आणण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने घेण्यात आला आहे. या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शासनाला जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दिले आहे.

मराठा समाजातील मुलामुलींने लग्न करताना प्री वेडिंग शूट करू नये या ठरावावर सर्व समाज  बांधवांनी एकमताने मान्यता देण्यात आली. प्री वेडिंग शूट वर अनावश्यक पैसे खर्च होतात. वैयक्तिक आणि खासगी फोटो सार्वजनिक होतात. या गोष्टींवर आळा घालावा या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.   

प्री वेडिंग शूटसाठी लागणारा खर्च एखाद्या गरीबाच्या घरासाठी द्यावा किंवा गरीब घरातील कन्येसाठी द्यावा अशी संकल्पना या मेळाव्यात मान्यवराने मंडळी. प्रत्येक पालकाने आपल्या मुला मुलीचे सध्या पद्धतीने करावे असा प्रस्ताव या मेळाव्यात मांडण्यात आला.  
 
Edited by - Priya Dixit