1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2023 (08:04 IST)

खाजगी प्रवासी बस पुणे-सोलापूर महामार्गावर उलटली,अनेक प्रवासी जखमी

accident
दुचाकीस्वाराला वाचवताना खाजगी प्रवासी बस पलटी होऊन अनेक जण जखमी झाले आहेत.ही घटना रात्री  पुणे सोलापूर महामार्गावर झोपडी हॉटेल नजीक घडली.
खाजगी ऑरेंज कंपनीची प्रवासी बस मुंबई ते निजामाबाद असा प्रवास करत असताना पुणे सोलापूर महामार्गावर भांडगाव गावच्या हद्दीत असताना अचानक दुचाकीस्वार समोर आल्याने बस महामार्गावर पलटी झाली. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून जखमींमध्ये महिला , पुरुष व लहान मुलांचा समावेश आहे. अपघात घडला त्यावेळी बस मध्ये एकूण ३८ प्रवासी प्रवास करीत होते.
 
अपघाताची माहिती मिळताच तातडीने यवत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी तातडीने जखमींना उपचारासाठी चौफुला व यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यवत ग्रामीण रुग्णालयातील चार गंभीर जखमी रुग्णांना ससून येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल जखमी प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे बस क्लिनर राहुल गंगाधर तरटे (रा. नरसिंग नांदेड),  साक्षी नागनाथ हांडे (वय १५ वर्षे रा. देहू रोड आळंदी),  शकुंतला दिगंबर वाळके (वय ६० रा. देहू)  , विघ्नेश रमेश शकुला (वय ११ ,रा. उमरगा ) ,  निहारिका नागनाथ हांडे पाटील (वय ३ देहू आळंदी)
 
Edited By- Ratnadeep Ranshoor